About: http://data.cimple.eu/claim-review/5d190e948c327e66360c2e9ed8c4ffaa5939f1e1dab062c1b3e40fcd     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: रडत असलेल्या जुळ्या मुलांच्या व्हिडिओ सोबत केलेला दावा खोटा आहे व्हायरल होत असलेल्या जुळ्या मुलांच्या व्हिडिओ सोबत केलेला दावा खोटा आहे. या मुलांचा जन्म २०१८ साली झाला असून ते आणि त्यांची आई सुखरूप आहे. - By: Pallavi Mishra - Published: Jun 29, 2021 at 11:43 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात मुलं रडताना पहिले जाऊ शकतात. व्हिडिओ मध्ये दिसत आहे कि मुलं आधी रडत आहे आणि त्यानंतर एक मेकांना मिठी मारल्यावर शांत हुन जातात. पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि या मुलांची आई त्यांना जन्म दिल्यावरच वारली, त्यानंतर मुलं स्वतःच रडतात आणि शांत होतात. पोस्ट माडेच पुढे अपील करण्यात येत आहे कि ज्या आई ला मुलं नाही त्यांनी या मुलांची मदत करावी. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. या मुलांचा जन्म २०१८ साली साओ पाओलो मध्ये झाला होता. यांना जन्म देताना तेथील डॉक्टर ने हा व्हिडिओ अपलोड केला. डॉक्टर ने कन्फर्म देखील केले हि व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. मुलांची आई सुखरूप आहे. काय होत आहे व्हायरल? फेसबुक यूजर Ranjeet Singh यांनी हा पोस्ट शेअर केले आणि व्हिडिओ वर लिहले “इन बच्चों का इनकी मां के सिवा और कोई नहीं है। मगर आज इन्हें इनकी मां भी छोड़कर इस दुनिया से चली गयी। जिस मां के बच्चे नहीं हैं वो मां इनका सहारा बने।” या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात गूगल रिव्हर्स इमेज सर्च पासून केली. व्हायरल व्हिडिओ चा तपास आम्ही किफ्रेम्स च्या मदतीने केला. आम्हाला २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट्स मध्ये व्हायरल व्हिडिओ दिसला. या रिपोर्ट्स प्रमाणे, हा व्हिडिओ डॉ. रोड्रिगो दा रोसा ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर सगळ्यात आधी अपलोड केला होता. बातमीत व्हायरल दाव्याच्या बातमीचा उल्लेख नाही. आम्हाला याच डिस्क्रिप्शन सोबत हा व्हिडिओ westernjournal.com/ वर देखील मिळाला. इथे पण व्हायरल होत असलेल्या दाव्याचा उल्लेख नव्हता. या मुलांचा व्हिडिओ अपलोड करणारे आणि त्यांच्या आईचे डॉक्टर, डॉ. रोड्रिगो दा रोसा हे खूप विख्यात डॉक्टर आहे आणि यांनी प्रसूती वर बरेच पुस्तक लिहले आहे. ते ब्राज़ीलियाई सोसाइटी ऑफ़ ह्यूमन रिप्रोडक्शन सोबत देखील एफिलिएटेड आहेत. आम्हाला ओरिजिनल व्हिडिओ डॉ रोड्रिगो दा रोसा यांच्या अकाउंट वर 28 ऑगस्ट 2018 रोजी अपलोड केलेली दिसली. पोस्ट सोबत डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते: दुःखात आणि सुखात एकत्र म्हणून मला जुळी मुलं आवडतात.” इथे देखील व्हायरल होत असलेल्या दाव्याचा उल्लेख नाही आहे. या विषयी आम्ही डॉ. रोड्रिगो दा रोसा यांना इंस्टाग्राम द्वारे संपर्क केला आणि त्यांना व्हायरल होत असलेला दावा सांगितला. त्यांनी म्हणले, “हा व्हिडिओ २०१८ चा आहे, या मुलांचा जन्म माझ्याच हस्ते झाला आणि मी त्यांचा व्हिडिओ इंस्टाग्राम वर अपलोड केला. मुलांचा जन्म नॉर्मल झाला होता आणि मुलं आणि त्यांची आई सुखरूप आहेत, व्हायरल दावा खोटा आहे”. फेसबुक यूजर Ranjeet Singh यांचे देखील आम्ही प्रोफाइल स्कॅन केले त्यात कळले कि ते लंडन चे रहिवासी आहेत. निष्कर्ष: व्हायरल होत असलेल्या जुळ्या मुलांच्या व्हिडिओ सोबत केलेला दावा खोटा आहे. या मुलांचा जन्म २०१८ साली झाला असून ते आणि त्यांची आई सुखरूप आहे. - Claim Review : रडत असलेल्या जुळ्या मुलांची आई वारली - Claimed By : Ranjeet Singh - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software