Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
बाॅलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता आमीर खानचा दहशतवाद्यांसोबत फोटो असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
यात म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आमीर खानने ट्विट देखील केले नाही. त्याचा एक फोटो देखील व्हायरल झाला आहे ज्यात तो दहशतवादी तारिक जमील आणि जुनैद शमशेद यांची भेट घेत आहे. याशिवाय 15 आॅगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाहीत टर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची मुलाखत घेतली.
आमीर खानने दहशतवाद्यांची खरंच भेट घेतली होती का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला एक ट्विट आढळून आले. ज्यात आमीर खानचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत यात दुसरा फोटो पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीसोबत तर पहिला फोटोत दोन व्यक्ती दिसत आहेत. या दोन व्यक्ती दहशतवादी तारिक जमील आणि जुनैद शमशेद असल्याचे म्हटले आहे.या भारतविरोधी लोकांची भेट आमीर खान घेत असल्याचे म्हटले आहे.
फेसबुकवर देखील हा दावा व्हायरल झाला असल्याचे आढळून आले.
आम्ही आमीर खानचा व्हायरल फोटो नेमका कधीचा आणि कुणासोबतचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स इमेजचा आणि यांडेक्सचा आधार घेतला असता जुनैद जमशेदच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवर व्हायरल फोटो 14 मार्च 2013 रोजी शेअर केल्याचे आढळून आले. जुनैद हे पाकिस्तानी गायक होते त्यांचे 2016 मध्ये विमान अपघातात निधन झाले. जमसेद यांचे नाव व्हायरल ट्विटमध्ये समशेद असे लिहिले आहे. शिवाय आमीर त्यांच्या सोबत असणारी दुसरी व्यक्ती मौलाना तारीक जमील हे असल्याचे म्हटले आहे. ते पाकिस्तानातील धर्म उपदेशक असून इस्लामिक स्काॅलर आहेत. शिवाय अनेक देशांत प्रसिद्ध आहेत.
आम्हाला या दोघांचे दहतवादी कनेक्शन असल्याचे एकही मीडिया रिपोर्ट आढळून आले नाही.
आमीर खानचा शाहीद आफ्रिदीबरोबरचा फोटो 2012 मधील मक्का यात्रेदरम्यानचा आहे. याबाबत एनडीटीव्ही ने देखील वृत्त दिले होते.
यावरुन हेच स्पष्ट होते की, आमीर खानचे जुने फोटो आत्ताचे म्हणून चुकीच्या दाव्याने व्हायरल करण्यात आले आहेत. शिवाय फोटोती व्यक्ती या दहशतवादी नसून गायक व धर्म उपदेशक आहेत.
एनडीटीव्ही- https://sports.ndtv.com/world-cup-2011/shahid-afridi-meets-aamir-khan-in-mecca-while-on-hajj-1546228
इकाॅनाॅमिक टाईम्स- https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/singer-turned-preacher-junaid-jamshed-feared-dead-in-pak-crash/articleshow/55857629.cms
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Raushan Thakur
January 29, 2025
Vasudha Beri
May 27, 2024
Yash Kshirsagar
February 17, 2021