About: http://data.cimple.eu/claim-review/5eb5e7562e70ef2a24327039c0dfbad907a9c6b44df78fe49c69a0e0     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: प्रिन्स चार्ल्स यांनी नेतन्याहू यांना ‘दहशतवादी’ संबोधित करणाऱ्या पोस्टरचे अनावरण नाही केले, एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल विश्वास न्यूज यांना त्यांच्या तपासात हा व्हायरल व्हिडिओ एडिट केला असल्याचे आढळून आले. या व्हिडिओमध्ये नेतान्याहू नव्हते. संपूर्ण चित्र बदलण्यात आले आहे. मूळ चित्रात प्रिन्स चार्ल्स यांचे चित्र होते आणि त्यावर काहीही लिहिलेले नव्हते. हा व्हिडिओ, प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या पहिल्या अधिकृतरित्या पेंट केलेल्या चित्राचे अनावरण केले तेव्हाचा आहे. मूळ चित्र एडिट करण्यात आले आहे आणि त्यास बनावट दाव्यांसह पसरवले जात आहे. - By: Umam Noor - Published: Oct 31, 2024 at 04:35 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रिन्स चार्ल्स III यांना, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या चित्रावरून पडदा हटवताना पाहिले जाऊ शकते. त्याचबरोबर, या चित्रात “दहशतवादी” असेही लिहिलेले दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना, वापरकर्ते असा दावा करत आहेत की, युरोपने बेंजामिन नेतन्याहू याचे ‘दहशतवादी’ म्हणून वर्णन करत एक चित्र जारी केले आहे. विश्वास न्यूज यांना त्यांच्या तपासात हा व्हायरल व्हिडिओ एडिट केला असल्याचे आढळून आले. या व्हिडिओमध्ये नेतान्याहू नव्हते. संपूर्ण चित्र बदलण्यात आले आहे. मूळ चित्रात प्रिन्स चार्ल्स यांचे चित्र होते आणि त्यावर काहीही लिहिलेले नव्हते. हा व्हिडिओ, प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या पहिल्या अधिकृतरित्या पेंट केलेल्या चित्राचे अनावरण केले तेव्हाचा आहे. मूळ चित्र एडिट करण्यात आले आहे आणि त्यास बनावट दाव्यांसह पसरवले जात आहे. व्हायरल पोस्टमध्ये काय आहे? व्हायरल पोस्ट शेअर करताना फेसबुक वापरकर्त्याने लिहिले की, “युरोपने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. काल त्यांच्या एका मोठ्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यास जगभर व्हायरल करा. आता त्यास जगभर व्हायरल करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा. तपास आमचा तपास सुरू करण्यासाठी, आम्ही प्रथम गुगल लेन्स वापरून व्हायरल व्हिडिओमधून कीफ्रेम शोधल्या. शोधल्यावर, आम्हाला हा व्हिडिओ ‘द रॉयल फॅमिली चॅनल’च्या सत्यापित यूट्यूब चॅनलवर सापडला. येथे व्हिडिओमध्ये, प्रिन्स चार्ल्स त्यांच्या पोस्टरचे अनावरण करताना दिसत आहेत. रॉयल फॅमिली चॅनलच्या व्हेरिफाईड यूट्यूब चॅनलवर आढळलेला मूळ व्हिडिओ आणि व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यास मूळ व्हिडिओमध्ये बदल करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मूळ व्हिडिओमध्ये प्रिन्स चार्ल्स यांचे चित्र आहे. त्यास एडिट करून बेंजामिन नेतन्याहू यांच्या चित्रासह हे सर्व लिहिण्यात आले आहे. येथे तुम्ही मूळ आणि एडिट केलेल्या चित्रांतील फरक पाहू शकता. 14 मे 2024 रोजी, प्रिन्स चार्ल्स यांच्या त्याच पोर्ट्रेटवर बीबीसीच्या अहवालानुसार, ‘प्रिन्स चार्ल्स III यांच्या राज्याभिषेकानंतरच्या पहिल्या अधिकृत चित्राचे अनावरण बकिंगहॅम पॅलेसमध्ये करण्यात आले आहे. जोनाथन येओ यांनी तयार केलेले हे पेंटिंग अंदाजे 8 फूट 6 इंच बाय 6 फूट 6 इंच इतके आहे. व्हायरल व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी, आम्ही आमचे भागीदार, दैनिक जागरणचे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर बातम्या देणारे ज्येष्ठ पत्रकार जेपी रंजन यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यांनी आम्हाला या गोष्टीची पुष्टी केली की, व्हायरल व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. प्रिन्स चार्ल्स यांनी बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात अशा कोणत्याही पोस्टरचे अनावरण केलेले नाही. आता बनावट पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक वापरकर्त्याचे सोशल स्कॅनिंग करण्याची पाळी होती. आम्हाला आढळले की, वापरकर्ता हा, पाकिस्तानचा आहे. निष्कर्ष: विश्वास न्यूज यांना त्यांच्या तपासात हा व्हायरल व्हिडिओ एडिट केला असल्याचे आढळून आले. या व्हिडिओमध्ये नेतान्याहू नव्हते. संपूर्ण चित्र बदलण्यात आले आहे. मूळ चित्रात प्रिन्स चार्ल्स यांचे चित्र होते आणि त्यावर काहीही लिहिलेले नव्हते. हा व्हिडिओ, प्रिन्स चार्ल्स यांनी त्यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या पहिल्या अधिकृतरित्या पेंट केलेल्या चित्राचे अनावरण केले तेव्हाचा आहे. मूळ चित्र एडिट करण्यात आले आहे आणि त्यास बनावट दाव्यांसह पसरवले जात आहे. - Claim Review : युरोपने बेंजामिन नेतन्याहू यांचे 'दहशतवादी' म्हणून वर्णन करणारे चित्र प्रसिद्ध केले आहे. - Claimed By : FB User- Muhmmad Irfan - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software