About: http://data.cimple.eu/claim-review/646330396fd8f8c4067af35e53cbfbaa71e7693bcb335da8ae01b740     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: व्हायरल चित्रात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी नाही, अमेरिकन अभिनेत्री रीस विदरस्पून आहे व्हायरल पोस्टमधील तरुणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी नसून हॉलिवूड अभिनेत्री रीस विदरस्पून आहे. व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे. - By: Ankita Deshkar - Published: Dec 12, 2022 at 05:51 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विश्वास न्यूज ला एक पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसली. ह्या पोस्ट मध्ये दोन चित्र होते, एका चित्रात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आहेत, तर असा दावा करण्यात येत आहे कि दुसऱ्या चित्रात तरुणाईतील सोनिया गांधी आहेत. विश्वास न्यूज ने तपास केला असता असे पुढे आले कि चित्रात सोनिया गांधी नाही तर हॉलिवूड अभिनेत्री रीस विदरस्पून आहे. काय होत आहे व्हायरल? फेसबुक यूजर, Bharat Puse ने व्हायरल पोस्ट फेसबुक ग्रुप, एक कोटी भाजपा समर्थक वर पोस्ट केली आणि लिहले. ह्या चित्रावर लिहले होते: जब वो 15 साल CM और 7 साल PM रहने के बावजूद तुम्हारे लिए चायवाला है, तो तुम्हें अपनी पुरानी पहचान से परेशानी क्यों है छम्मक छल्लो. हि पोस्ट आणि ह्याचा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: विश्वास न्यूजने उजवीकडे चित्र क्रॉप करून तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही Google Lens वापरून ही प्रतिमा शोधली. विश्वास न्यूज ला एक आर्टिकल सापडले, ज्याचे शीर्षक होते: 30 Pictures of Young Reese Witherspoon ह्या आर्टिकल मध्ये म्हंटले होते: या गॅलरीमध्ये एक सुंदर, तरुण, रीस विदरस्पून, तिच्या लहानपणी, तसेच तिचे किशोरवयीन वर्षे आणि १९९० च्या दशकाच्या मध्यात 20 च्या सुरुवातीच्या काळातील तिच्या फोटोंचा समावेश आहे. ह्या आर्टिकल मध्ये आठव्या नंबर वर आम्हाला व्हायरल चित्र सापडले. आम्हाला हे चित्र अजून एका आर्टिकल मध्ये सापडले ज्याचे शीर्षक होते: Relive Reese Witherspoon’s Last 25 Years in Hollywood, in Photos आम्हाला स्टॉक इमेज वेबसाइट, alamy.com वर देखील व्हायरल चित्र सापडले. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की हे 1996 मधील रीस विदरस्पूनचे फिअरमधील छायाचित्र आहे. त्यामुळे व्हायरल झालेला फोटो अमेरिकन अभिनेत्री रिस विदरस्पूनचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आम्ही काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जुने फोटो तपासले. आम्हाला rediff.com वरील एका लेखात तरुण सोनिया गांधींचे छायाचित्र मिळाले. NDTV वरील लेखात आम्हाला काही चित्रे देखील सापडली. तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही काँग्रेसच्या प्रवक्त्या रजनी पाटील ह्यांना संपर्क केला. व्हायरल झालेला फोटो काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी अशा बातम्या पसरवल्याबद्दल ट्रोल्स आणि लोकांच्या नकारात्मक मानसिकतेचाही निषेध केला. त्यांनी आम्हाला असेही सांगितले की 1990 पासून सोनिया गांधी राजकारणात खूप सक्रिय आहेत आणि त्यांनी कधीही व्हायरल पोस्टमध्ये दर्शविल्याप्रमाणे कपडे घातले नाहीत. तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही फेसबुक यूजर Bhushan Puse ह्यांचे सोशल बॅकग्राउंड चेक केले. भूषण पुसे हे औरंगाबादचे रहिवासी असून त्यांना 2,071 लोकं फॉलो करतात. निष्कर्ष: व्हायरल पोस्टमधील तरुणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी नसून हॉलिवूड अभिनेत्री रीस विदरस्पून आहे. व्हायरल पोस्ट दिशाभूल करणारी आहे. - Claim Review : व्हायरल चित्रात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आहे - Claimed By : Bhushan Puse - Fact Check : Misleading Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 3 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software