schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
POK मधील बकरवाल समाजाने भारत आणि भारतीय लष्कराला पाठींबा देण्याची शपथ घेतली.
Fact
संबंधित व्हिडीओ काश्मीरच्या उरी प्रांतातील गुज्जर बकरवाल समाजाने आयोजित केलेल्या एक वर्षे जुन्या एसटी बचाव आंदोलनातील आहे.
POK अर्थात पाक व्याप्त काश्मीर मधील बकरवाल समाजाने भारत आणि भारतीय लष्कराला पाठींबा देण्याची शपथ घेतली. असे सांगत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर आढळला.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये, पारंपारिक काश्मिरी पोशाख घातलेला एक माणूस शपथ देताना दिसत आहे, तर त्याच्या आजूबाजूला उभे असलेले तरुण त्याच्या मागोमाग शपथ घेताना दिसतात.
“हिंदुस्थानच्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी मी भारतीय सैन्यासोबत असेन,” असे व्हिडिओमधील संभाषणात ऐकायला मिळते.
Newschecker ने व्हिडिओची मुख्य फ्रेम काढून त्यावर रिव्हर्स इमेज शोध केला. आम्हाला The people’s voice या स्थानिक काश्मिरी वाहिनीने 20 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या फेसबुक पेजवर प्रकाशित केलेली बातमी सापडली. बातमीनुसार, हे फुटेज उरी येथील गुज्जर बकरवाल समाजाच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या एसटी बचाओ आंदोलनातील आहे.
The Gujjars of Uri J&K या फेसबुक पेजने 19 ऑगस्ट 2023 रोजी याच वर्णनासह हा व्हिडिओ पोस्ट केला असल्याचेही पाहायला मिळाले.
20 ऑगस्ट 2023 रोजी, याच वर्णनासह हा व्हिडिओ J&K Gujjar Bakerwal Union च्या फेसबुक पेजवर देखील पोस्ट करण्यात आला होता.
त्यानंतर आम्ही द पीपल्स व्हॉईस या मीडिया कंपनीचे रिपोर्टर इक्बाल चोहान यांना फोन केला. हा व्हिडीओ उरी येथील असल्याची त्यांनी पुष्टी केली.
“अलीकडच्या काळात, जम्मू-काश्मीरमधील पहाडी समुदायांना एसटीकडून लक्ष्य करण्यात आले आहे. परंपरेने एसटी प्रवर्गातील गुजर बकरवाल समाजाने वर्गीकरणाविरोधात आंदोलन केले होते. समाजातील सदस्यांनी देशाच्या संविधानाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याला पाठिंबा देण्याची शपथ घेतली,” असे ते म्हणाले, हा कार्यक्रम झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित होतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
पहाडी समाज आणि इतर तीन समुदायांना एसटी समुदाय म्हणून ओळखले गेले आहे. 10 ऑगस्ट, 2023 रोजीच्या फ्रंटलाइनने श्रेणीमध्ये समावेशाविरोधात गुज्जर बकरवाल समाजाच्या तीव्र निषेधाविषयी वृत्त दिले होते.
आमच्या तपासादरम्यान, असे आढळून आले की व्हायरल व्हिडिओचा पाकव्याप्त काश्मीरशी काहीही संबंध नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये जम्मू-काश्मीरमधील गुज्जर बकरवाल समुदायाचे उरी येथे निदर्शने करणारे दृश्य असून ते पाकव्याप्त काश्मीरमधील बकरवाल समुदायाचे असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे.
Our Sources
Facebook Post by The people’s voice on August 20,2023
Facebook Post by The Gujjars of Uri J&K on August 19,2023
Facebook Post by J&k Gujjar Bakerwal union on August 20,2023
News report by Frontline on August 10,2023
Conversation with Journalist Iqbal Chohan
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|