About: http://data.cimple.eu/claim-review/67cb9b6e0474d8a049409b9f4ccaaa9c771d82c627d2f0262004a106     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डने दावा केला आहे. Fact हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र्रात खळबळ माजवून देणारा एक दावा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डने दावा केला आहे, असे हा दावा सांगतो. विशेष म्हणजे राजकीय दृष्टया आणि प्रचाराचा एक भाग बनविण्यासाठीचे नरेटिव्ह म्हणून हा दावा वापरला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. X आणि Facebook वर मराठीच्या बरोबरीनेच इतर भाषांत हा दावा शेयर होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. दाव्यांचे संग्रहण येथे, येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येईल. “अत्यंत संतापजनक! हिंदूचे आराध्य व मुंबईची ओळख असलेल्या सिद्धीविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा! महाविकास आघाडीने उलेमांच्या मागण्यांवर लेखी संमतीपत्र दिलेले आहे, त्यात वक्फ बद्दल सुद्धा मागणी आहे. मंदिरे, गडकिल्ले वाचवायचे असतील तर महायुतीला मत द्या!” अशा कॅप्शनखाली हा दावा शेयर केला जात आहे. विशेष म्हणजे दावा करताना कॅप्शन सोबत ‘सकाळ’ माध्यमाचा लोगो असणारे एक न्यूजकार्ड शेयर करण्यात आले आहे. यामध्ये सिद्धिविनायकाचा फोटो आणि मंदिराचा फोटो यांचे कोलाज असून काही दाव्यांमध्ये वरील भागात ‘म्हणूनच उबाठा आणि काँग्रेस नको’ असे वाक्य असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. Fact Check/ Verification संबंधित दाव्यात वापरण्यात आलेल्या न्यूजकार्डवर सकाळ माध्यमाचा लोगो असल्याने आम्ही सर्वप्रथम या माध्यमाने कुठे याप्रकारची बातमी किंवा पोस्ट प्रसिद्ध केली आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अशी बातमी आढळली नाही, दरम्यान याबद्दल भाष्य करणारी ‘सकाळ’ च्या अधिकृत X खात्यावरील १८ नोव्हेंबर २०२४ रोजीची एक पोस्ट मिळाली. “#fakenewsalert : सध्या सोशल मीडियावर ‘मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डचा दावा’ नावाने एक दिशाभूल करणारे क्रिएटिव्ह ‘सकाळ’च्या नावाने व्हायरल करण्यात आलं आहे. मात्र असं कोणतंही क्रिएटिव्ह ‘सकाळ’ने तयार केलं नसून यात ‘सकाळ’चं नाव आणि लोगो वापरून हा खोडसाळपणा केला आहे.” असेच सकाळने स्पष्ट केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. सकाळ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनीही आपल्या व्हेरिफाइड X हॅण्डलवरून ‘हे क्रिएटिव्ह सकाळचं नाही’ असं स्पष्ट केल्याचं त्यांच्या १८ नोव्हेंबर २०२४ च्या पोस्टवरून पाहायला मिळालं. यामुळे सकाळचे नाव आणि लोगो वापरण्याचा प्रकार खोटा असल्याचे आमच्या निदर्शनास आले. पुढील तपासात आम्ही ज्या मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिराबद्दल हा दावा केला जात आहे त्या मंदिराच्या ट्रस्ट शी संपर्क संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चे खजिनदार पवन कुमार त्रिपाठी यांच्याशी आमचा दूरध्वनीवरून संपर्क झाला. त्यांनी “सिद्धिविनायक मंदिरावर दावा करणारे कोणतेही पत्र वक्फ बोर्डाकडून आलेले नाही.” असे सांगितले. व्हायरल दाव्यासंदर्भात विचारले असता, “ही माहिती खोटी आहे.” असे त्यांनी सांगितले. दरम्यान आणखी शोध घेताना आम्हाला “वक्फ बोर्डाचा सिद्धिविनायक मंदिरावर दावा सांगणाऱ्या व्हायरल पोस्टमागचं सत्य जाणून घ्या” या शीर्षकाखालील बीबीसी ने आपल्या अधिकृत वेबसाईटवर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केलेला लेख आढळला. यामध्ये महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जुनैद सय्यद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, “ही एक फेक न्यूज आहे. अशा प्रकारची माहिती कुठून प्रसारित झाली, काही कल्पना नाही. ही आमची प्रॉपर्टी आहे, अशा स्वरुपाचा कोणताही दावा ना आमच्याकडून करण्यात आला आहे, ना असं काही प्रसारित करण्यात आलं आहे. मात्र, हे कुठून पसरलं आहे, ते माहिती नाही. वक्फ बोर्डाकडून असा कोणताही अधिकृत दावा करण्यात आलेला नाही, तसेच प्रोसेसमध्येदेखील अशी काही चर्चा नाही.” अशी माहिती दिल्याचे आम्हाला वाचायला मिळाले. यावरून संबंधित दावा निराधार आणि खोटा असल्याचे स्पष्ट झाले. Conclusion अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डने दावा केला आहे, असे सांगणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. Result: False Our Sources Tweet made by Sakal on November 18, 2024 Tweet made by Shital Pawar, Executive Editor, Sakal on November 18, 2024 Article published by BBC on November 19, 2024 Conversation with Pavan Kumar Tripathi, Treasurer, Siddhivinayak Mandir Trust, Mumbai कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software