About: http://data.cimple.eu/claim-review/6bf63011e2736d88370afd69dff8f3991ccb7053f434ecd2d8ae8c5c     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: बंदर एका वृद्ध महिलेला मिठी देतानाच व्हिडिओ महाराष्ट्राचा नाही, राजस्थान चा आहे विश्वास न्यूज च्या तपासात बंदराचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाराष्ट्राचा नसून राजस्थान मधील फलोदि गावचा असल्याचा समजले. यातील महिलेचे नाव देखील भडसाळे आजी नसून भवरी देवी आहे. - By: Ankita Deshkar - Published: Jul 9, 2021 at 05:58 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): विसश्वास न्यूज ला एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसला जिथे एक बंदर एक वृद्ध महिलेला मिठी मारत आहे. शिव वृद्ध महिला पलंगावर झोपलेली दिसते. असा दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका, जामसंडे (वळकूवाडीतील) मधला आहे. पण विश्वास न्यूज च्या तपासात हा व्हिडिओ फलोदि, राजस्थान चा आहे. काय होत आहे व्हायरल? विश्वास न्यूज ला सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसला. यात एक बंदर एका वृद्ध महिलेला मिठी मारताना दिसत आहे, आणि वृद्ध महिला पलंगावर लोळलेली दिसते. काही नातेवाईक बंदराकडे बघताना दिसतात तर कोणी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. फेसबुक यूजर Arvind Taral यांने हा व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर पोस्ट केला आणि लिहले: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका, जामसंडे (वळकूवाडीतील) श्रीमती. भडसाळे आजी राेजी एका माकडाला खायला द्यायची आजी मध्येच आजारी पडल्याने ती २/३घरा बाहेर आली नाही म्हणून चक्क माकडच आजी बघायला घरात आले. खरंच मुक्या प्राण्यांकडून शिकण्यासारख आहे! या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: विश्वास न्यूज ने फॅक्ट चेक ची सुरुवात InVid तोल मध्ये व्हिडिओ अपलोड करून त्याचे किफ्रेम्स मिळवण्यापासून केली. या किफ्रेम्स वर विश्वास न्यूज ने रिव्हर्स सर्च केले. ते केल्यानंतर आम्हाला एक लिंक मिळाली. India.com या वेबसाईट वर आम्हाला एक बातमी प्रकाशित झाल्याची दिसली. या बातमीचे शीर्षक होते: This Cute Video of a Langur Hugging a Dadi is Going Viral, Internet Loves it हि बातमी २३ जून, २०२१ रोजी अपलोड केली होती. या बातमीत सांगितले होते कि हा व्हिडिओ फलोदि, राजस्थान मधला आहे. हि बातमी जयपूर डेटलाईन ने प्रकाशित झाली होती. या बातमीत म्हंटले होते कि एक बंदर ९० वर्षीय भवरी देवी यांच्या बाजूला बसलेला दिसतो आणि त्यानंतर त्यांना मिठी मारतो . यात असे देखील म्हंटले आहे कि परिवारातील लोकांना हे कळलेच नाही कि बंदर आला कुठून. हि बातमी इथे वाचा. अजून थोडे इंटरनेट सर्च केल्यावर आम्हाला हा व्हिडिओ ‘channel 24 plus news’ याच्या युट्युब चॅनेल वर सापडला. यात त्या वृद्ध महिला आणि तिच्या नातेवाईकाचा इंटरव्यू घेण्यात आला होता. त्यात देखील असे कुठेच म्हंटले नव्हते कि हि महिला रोज त्या बंदराला खायला घालायची. हा व्हिडिओ २७, जून २०२१ रोजी अपलोड केला गेला होता. हा व्हिडिओ इथे बघा. विश्वास न्यूज ने या संदर्भात, Channel 24 News, जोधपूर चे, सिनियर कॉररेस्पॉण्डेण्ट दूंगर सिंग यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा व्हिडिओ राजस्थान मधील फलोदि गावाचा आहे. हा बंदर खूप मनमिळाऊ स्वभावाचा आहे आणि म्हणून तो लोकांसोबत दिसतो. असाच त्याचा एका लहान मुलासोबत खेळतानाचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सिंग यांनी आमच्या सोबत शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर फलोदि मधील त्यांच्या टीम नि हि बातमी केली असे देखील त्यांनी सांगितले. तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने फेसबुक यूजर ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला त्यांचा तपास केला. त्यात कळले यूजर मुंबई चा रहिवासी आहे. निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात बंदराचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाराष्ट्राचा नसून राजस्थान मधील फलोदि गावचा असल्याचा समजले. यातील महिलेचे नाव देखील भडसाळे आजी नसून भवरी देवी आहे. - Claim Review : बंदर एका वृद्ध महिलेला मिठी देतानाच व्हिडिओ महाराष्ट्राचा - Claimed By : Arvind Taral - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software