schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
केळीतून अळ्या (worms in banana) बाहेर काढून दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे आणि दावा केला आहे की, ‘विषारी अळी असलेली केळी बाजारात आली आहे. न्यूजचेकरच्या तपासणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आणि हा व्हिडिओ भारतातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, नमस्कार मित्रांनो आणि लोकांनो कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त पसरवा.अलीकडेच, सोमालियातून 500 टन केळी बाजारात आली, या केळीतून अळ्या बाहेर काढल्यावर हेलिकोबॅक्टर नावाचा एक जंत असतो, जो पोटात विषारी द्रव सोडतो, त्यानंतर पुढील लक्षणे (जुलाब, उलट्या, मळमळ, डोकेदुखी) दिसून येतात आणि 12 तासांनंतर व्यक्तीचा मृत्यू होतो…कृपया या दिवसात केळी विकत घेणे आणि खाणे टाळा, किंवा जर तुम्ही खरेदी करत असाल तर ते आत बघून खात्री करा. व्हिडिओ पहा…
केळीतून अळ्या (worms in banana) बाहेर काढून दाखवणारा व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी, आम्ही व्हिडिओमधील काही किफ्रेम्स काढून गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधल्या असता त्याला पर्शियन आणि अरबी भाषेत लिहिलेल्या लेखांच्या अनेक लिंक सापडल्या. यावरून असे सूचित होते की हा व्हिडिओ इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
‘worms in banana’ या किवर्ड्सनी शोध सुरु केला असता आम्हाला दुबई स्थित Khaleej Times या वर्तमानपत्रात एक लेख आढळून आला. यात केळीतून अळ्या (worms in banana) बाहेर काढून दाखवणारा व्हिडिओबाबत UAE मधील अधिकार्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणासंदर्भात आहे.
पुढे, आम्हाला UAE मधील मीडिया हाऊस, ‘UAE BARQ’ द्वारे केलेल एक ट्विट आढळले ज्यामध्ये अबूधाबी कृषी आणि अन्न सुरक्षा प्राधिकरणाचे विधान आहे.
व्हिडिओ खोटा आहे आणि त्यात दिशाभूल करणारी माहिती आहे कारण “हेलिकोबॅक्टर हा एक प्रकारचा जीवाणू आहे आणि जंत नाही,” असे विधानात म्हटले आहे.
रियाध स्थित Carcinogens संशोधक Fahad Alkhodairy यांनी देखील या व्हायरल केळीतून अळ्या (worms in banana) बाहेर काढून दाखवणा-या व्हिडिओबद्दल ट्विट केले आहे की, व्हायरल दावा खोटा आहे.
न्यूजचेकरशी बोलताना, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की केळीतून अळ्या (worms in banana) बाहेर काढून दाखवणा-या व्हिडिओतील दावे खोटे आहेत. आम्हाला FSSAI कडून पुढील माहिती मिळेल तेव्हा आम्ही आमची तथ्य तपासणी अपडेट करू.
संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत असलेल्या अन्न आणि कृषी संस्थेच्या मते, 2010 ते 2017 या कालावधीत भारत हा जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश राहिलेला आहे आणि दरवर्षी सरासरी 29 दशलक्ष टन केळीचे उत्पादन होते.
हे देखील वाचा : तैवानमध्ये दिवाळीनिमित्त 101 मजली इमारतीवर आतिशबाजी करण्यात आली?
केळीतून अळ्या (worms in banana) बाहेर काढून दाखवणारा व्हिडिओ खरा नाही आणि तो भारतातील नाही. अबुधाबी आणि भारतातील अन्न सुरक्षा विभागाने देखील याबाबत स्पष्टिकरण दिले आहे.
Statement from Abu Dabi Agriculture and Food Safety Authority
Confirmation from FSSAI
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
|