About: http://data.cimple.eu/claim-review/8a4dd49bfdc8bac998ac39662f7102bd30f71966ce7def2bb045d332     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: एका आर्टिस्ट चे बनवलेले छायाचित्र मंगळ ग्रह च्या सूर्यास्ताचे पहिले फोटो सांगून होत आहे व्हायरल विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा निघाला. हे छायाचित्र मार्स चे नाही, याला एका ग्राफिक आर्टिस्ट ने एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनविले आहे. - By: Pallavi Mishra - Published: Mar 23, 2021 at 09:32 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर सध्या व्हायरल होत असलेल्या एका छायाचित्रात सूर्य मावळताना बघू शकतात. छायाचित्रासोबत दावा करण्यात येत आहे कि हे मार्स ग्रहाचे छायाचित्र आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. हे छायाचित्र मार्स ग्रहाचे नसून एका ग्राफिक आर्टिस्ट ने एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनवले गेले आहे. काय होत आहे व्हायरल? व्हायरल पोस्ट मध्ये मावळत्या सूर्याचे छायाचित्र आहे आणि लिहले आहे, “First ever photo of a sunset on Mars” याचा मराठी अनुवाद आहे, “मंगळावर सूर्यास्ताचे पहिले छायाचित्र.” पोस्ट ची आर्काइव्ह लिंक इथे बघा. तपास: या पोस्ट चा तपास आम्ही सगळ्यात आधी त्या छायाचित्राला निरखून बघितले, त्या नंतर हे छायाचित्र आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च द्वारे सर्च केले. आम्हाला gettyimages वर हे छायाचित्र मिळाले. या छायाचित्राबरोबर लिहले होते कि हे छायाचित्र ग्राफिकली बनवले गेले आहे. हे छायाचित्र साइंस फोटो लाइब्रेरी च्या मार्क गार्लिक यांनी बनवले. आम्हाला हे छायाचित्र alamy आणि sciencephoto.com वर देखील मिळाले. दोन्ही वेबसाईट वर दिलेल्या माहिती प्रमाणे, हे एक इलस्ट्रेशन म्हणजे चित्रीकरण आहे, हे खरे छायाचित्र नाही. तपासाच्या शेवटच्या टप्प्यात विश्वास न्यूज ने मार्क गार्लिक यांच्यासोबत ट्विटर वर संवाद साधला, त्यांनी सांगितले, “हे छायाचित्र मी डिसेंबर २०१८ मध्ये फोटोशॉप आणि 3 डी मैक चा वापर करून बनवले. हि एक डिजिटल कला आहे, मार्स चे खरे छायाचित्र नाही. अजून शोधल्यावर आम्हाला नासा च्या वेबसाईट वर सूर्यास्ताचे छायाचित्र मिळाले. ते तुम्ही इथे बघू शकता. व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक यूजर Ravi Goutam चे सोशल स्कॅनिंग केल्यावर आम्हाला कळले कि त्यांचे फेसबुक वर ४,९५० मित्र आहे आणि यूजर हरियाणा चे रहिवासी आहेत. निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा निघाला. हे छायाचित्र मार्स चे नाही, याला एका ग्राफिक आर्टिस्ट ने एडिटिंग टूल्स च्या मदतीने बनविले आहे. - Claim Review : Photo of sunset on Mars - Claimed By : Ravi Goutam - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software