schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
सोशल मीडियावर 10 सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर केली जात असून यात, काॅंग्रसेचे नेते राशिद अल्वी यांनी जय श्रीराम बोलणा-यांना राक्षस म्हटले असल्याचे दिसते. या क्लिपमध्ये राशिद अल्वी हिंदीत म्हणतात की, “आज भी बहुत लोग जय श्री राम का नारा लगाते हैं, वो सब मुनि नहीं, निशाचर हैं, ये मुनि नहीं हैं यह तो घोर निशाचर हैं।”
बीजेपी आयटी सेलचे अमित मालवीय यांनी ही क्लिप शेअर करत म्हटले आहे की, सलमान खुर्शीद नंतर आता काॅंग्रेस नेते राशिद अल्वी जय श्री राम म्हणणा-यांना निशाचर (राक्षस) म्हणत आहेत. राम भक्तांबाबत काॅंग्रेसच्या विचारांत विष मिसळलेले आहे.
संग्रहित ट्विट इथे पाहू शकता.
भाजप हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव यांनीही असाच दावा ट्विटरवर शेअर केला आहे
संग्रहित ट्विट इथे पाहू शकता.
अनेक व्हेरिफाईड ट्विर यजर्सनीहा क्लिप एकसारख्याच दाव्याने शेअर केली आहे. यामध्ये पत्रकार अमिश देवगण यांचा देखील समावेश आहे. त्यांनी व्हिडिओ क्लिप शेअर करत म्हटले आहे की, सलमान खुर्शीद यांच्या हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हरामशी केल्यानंतर आत काॅंग्रेसचे एक नेता मियां राशिद अल्वी देखील मैदानात उतरले आहेत. राशिद अल्वी यांनी तर पुढे पाऊल टाकत म्हटले आहे की, जय श्रीराम बोलणारे राक्षस आहेत.
अनेक फेसबुक युजर्सनी देखील हा दावा शेअर केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तक ‘Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times’मध्ये हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांशी करण्यात आली आहे, त्यानंतर सलमान खुर्शीद यांच्यावर जोरदार टीका झाली. बीबीसी हिंदीच्या वृत्तानुसार, वाद वाढत असताना सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना हिंदू धर्माशी न करता दहशतवादी संघटनेशी केल्याचे सांगून त्याचे समर्थन केले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही Google वर काही कीवर्ड शोधले तेव्हा आम्हाला abplive ने प्रकाशित केलेला रिपोर्ट आढळून आला. मिळालेल्या वृत्तानुसार, काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी एका निवडणूक कार्यक्रमात कालनेमी राक्षसांचा उल्लेख करताना रामायणातील एक प्रसंग सांगितलेला आहे.
ते म्हणाले, “जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडला आणि सूर्योदयापूर्वी संजीवनी वनौषधी आणाव्या लागतील असे सांगण्यात आले, तेव्हा हनुमानजी संजीवनी वनौषधी घेण्यासाठी हिमालयात गेले. त्यावेळी कालनेमी राक्षस, साधूच्या वेषात झोपडीत बसला होता, त्याने जय श्री रामचा जप सुरू केला आणि जय श्री रामचा जप ऐकून हनुमानजी खाली आले. त्या राक्षसाने हनुमानजींना जय श्री राम म्हणण्याआधी आंघोळीसाठी पाठवले होते.आंघोळीच्या कुंडात एका मगरीने हनुमानजींवर हल्ला केला आणि मात्र हनुमानजीने तिचा वध केला, त्याच्यातून एक सुंदर अप्सरा बाहेर पडली, जिने हनुमानजींना सांगितले की, तुला आंघोळीला पाठवणारा मुनी नाही तर राक्षस आहे, त्यामुळे जय श्रीरामचा नारा लावणारा प्रत्येकजण मुनी नसतो हे सर्वांनी समजून घ्यावे. आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.”
याबाबत आम्ही यूट्यूबवर काही कीवर्डसह शोध घेतला तेव्हा आम्हालाmojo india news चॅनेलवर राशिद अल्वी यांच्या या भाषणाचा 6 मिनिटांचा व्हिडिओ सापडला. तो व्हिडिओ ऐकल्यानंतर कळले की, रशिद अल्वी यांनी कालनेमी राक्षसाच्या संदर्भात निशाचर गोष्ट सांगितली होती. याबाबत दिशाभूल करणारे दावे शेअर केले जात आहेत.
अशाप्रकारे, आमच्या तपासणीत आढळलेल्या तथ्यांवरून हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ क्लिप चुकीच्या दाव्याने शेअर होत आहे. राशिद अल्वी यांनी जय श्री राम बोलणाऱ्यांना राक्षस म्हटलेले नाही.
तुम्ही आमची इंग्रजीतील पडताळणी इथे वाचू शकता
Media report
Self Analysis
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
|