About: http://data.cimple.eu/claim-review/8be15107e23f069b59281f10b9e4a4b92738c379c4f55ebf1badbb60     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेमध्ये झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ इस्रायलशी जोडून केला जात आहे व्हायरल 'विश्वास न्यूज'ने केलेल्या चौकशीत हा व्हिडिओ 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या अमेरिकेतील हल्ल्याचा असल्याचे समोर आले आहे. त्याचा इस्रायलशी काहीही संबंध नाही. - By: Sharad Prakash Asthana - Published: Oct 9, 2024 at 06:18 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज). इराणने इस्रायलवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका बहुमजली इमारतीत स्फोट झाल्यानंतर लोक पळताना दिसत आहेत. काही वापरकर्ते हा व्हिडिओ शेअर करून त्याला आणि इस्रायलमध्ये झालेल्या हल्ल्याचा सांगत आहेत. ‘विश्वास न्यूज’ने केलेल्या चौकशीत हा व्हिडिओ 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या अमेरिकेतील हल्ल्याचा असल्याचे समोर आले आहे. त्याचा इस्रायलशी काहीही संबंध नाही. काय आहे व्हायरल पोस्ट फेसबुक वापरकर्ता Ashok Dadhwal याने 5 ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ पोस्ट (संग्रहित लिंक) करताना लिहिले की, “हा व्हिडिओ इस्रायलचा आहे. इस्त्रायली सैन्यात सामील झालेल्या आमच्या अंधभक्तांची मला काळजी वाटते, त्यांची काय अवस्था असेल???” तापास व्हायरल व्हिडिओची कीफ्रेम काढून तिचा गुगल लेन्सच्या मदतीने शोध घेतल्यानंतर, आम्हाला makeagif नावाच्या संकेतस्थळावर त्याची एक क्लिप सापडली. ती 10 वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आली होती आणि तिच्यावर फॉक्स 5 न्यूजचा लोगो लावलेला आहे. याच्या आधारे, आम्ही कीवर्डने शोध घेतला तेव्हा 22 नोव्हेंबर 2008 रोजी, Nathan Flach यूट्यूब चॅनेलवर याशी संबंधित व्हिडिओ बातम्या आढळल्या. त्यावर देखील फॉक्स 5 न्यूजचा लोगो लावलेला आहे. यासोबतच, ही क्लिप 11 सप्टेंबर 2001 रोजी प्रसारित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडिओ साऊथ टॉवर कोसळल्याचा आहे. या व्हायरल क्लिपचा एक भाग, सीबीएस8 डॉट कॉमवर अपलोड केलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये देखील पहिला जाऊ शकतो. ही डॉक्युमेंटरी 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यावर बनवण्यात आली होती. जॉर्ज डब्ल्यू बुश लायब्ररी डॉट जीओव्ही या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यात 2,977 लोक मारले गेले होते. दोन जेटलाइनर, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर, तर दुसरे एक, पेंटॅगॉनवर आदळले होते. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात 2 ऑक्टोबरला छापण्यात आलेल्या वृत्तानुसार, 1 ऑक्टोबरच्या रात्री इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागली होती. याबाबत इस्रायली फॅक्ट चेकर उरिया बार मेर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ इस्रायलचा नाही. आम्ही हा व्हिडिओ इस्रायलचा असल्याचा म्हणून शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे प्रोफाइल स्कॅन केले. हिमाचलमधील उनामध्ये राहणारा हा वापरकर्ता एका विचारसरणीने प्रभावित आहे. निष्कर्षः बहुमजली इमारत कोसळून झालेल्या चेंगराचेंगरीचा हा व्हिडिओ 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्याचा आहे. त्याचा इस्रायलशी काहीही संबंध नाही. - Claim Review : इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ. - Claimed By : FB User- Ashok Dadhwal - Fact Check : Misleading Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software