About: http://data.cimple.eu/claim-review/91ed777600c50bc1c9c3923735c7bbd562e3a21c82cc4d5e927faaa5     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: PIA प्लेन चा जुना कराची च्या पुरस्तिथीतला व्हिडिओ आताचा सांगून व्हायरल कराची एअरपोर्ट च्या रनवे वर पीआयए चा प्लेन उतरल्याचा व्हिडिओ जो आताचा सांगून व्हायरल होत आहे तो ऑगस्ट 2020 चा आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. - By: Ankita Deshkar - Published: Jul 20, 2022 at 06:01 PM विश्वास न्यूज (नवी दिल्ली): विश्वास न्यूज ला एका पुरस्तिथीत एरोप्लेन लँडिंग चा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असताना दिसला. दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ आताचा आहे. बरेच यूजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे कळले. हा व्हिडिओ २०२० सालचा आहे. काय होत आहे व्हायरल? फेसबुक यूजर ZK Productions नि व्हायरल व्हिडिओ शेअर केला आणि लिहले: live from Karachi airport हा पोस्ट आणि आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. हा व्हिडिओ पाकिस्तानी राजकारणी आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे ज्येष्ठ सदस्य फवाद चौधरी यांनीही या ट्विटर प्रोफाइलवर शेअर केला आहे. काही यूजर्स ने ह्या व्हिडिओ चा स्क्रीनग्रॅब देखील शेअर केला. Times of Islamabad, ह्या फेसबुक पेज ने देखील हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहले: PIA plane landing at an inundated Runway at Karachi Airport goes viral on social media तपास: विश्वास न्यूज ला असे खुपसारे कमेंट्स फेसबुक आणि ट्विटर वर शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये सापडले, ज्यात सांगण्यात येत होते कि हा व्हिडिओ जुना आहे. आम्ही त्यानंतर हा व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये मिळालेल्या किफ्रेम्स द्वारे शोधला. आम्ही यांडेक्स ची देखील ह्या तपासासाठी मदत घेतली. आम्हाला त्यात फेसबुक पेज AIRLIVE.net वर हा व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ 28th ऑगस्ट, 2020 रोजी शेअर करण्यात आला होता. ह्याचाच अर्थ, हा व्हिडिओ जुना आहे. कॅप्शन मध्ये लिहले होते: Karachi airport flooded. This PIA A320 was the last aircraft before the airport stopped operations. आम्हाला Pakistan Civil Aviation Authority चे अधिकृत ट्विटर हॅन्डल आणि त्यावर केलेले पोस्ट देखील मिळाले. ह्या मध्ये म्हंटल्याप्रमाणे हा व्हिडिओ जुना आहे. किवर्डस द्वारे शोधल्यावर विश्वास न्यूज ला एक 24 News HD नावाच्या युट्युब चॅनेल वर अपलोड केलेला सापडला. ह्या चॅनेल चे 6.54 मिलियन स्बस्क्राइबर्स आहेत. कॅप्शन मध्ये लिहले होते: Exclusive!! PIA Plane Emergency Landing On Water At Airport In Floods आता हे स्पष्ट झाले होते कि हा व्हिडिओ ऑगस्ट 27, 2020. तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही डॉन न्यूज, पाकिस्तानमधील पत्रकार सागर सुहिंदरो यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विश्वास न्यूजला सांगितले की, हा व्हिडिओ अलीकडचा नाही. 2020 साली पीआयएचे प्लेन कराचीच्या रनवेवर उतरले. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे. तपासाच्या शेवटच्या टप्प्यात, आम्ही ZK Productions पेज चा तपास केला. त्या पेज ला १२४ लोक लाईक करतात आणि १४७ लोक फॉलो करतात. ह्या पेज वर पाकिस्तान चा मजकूर जास्ती असतो. निष्कर्ष: कराची एअरपोर्ट च्या रनवे वर पीआयए चा प्लेन उतरल्याचा व्हिडिओ जो आताचा सांगून व्हायरल होत आहे तो ऑगस्ट 2020 चा आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. - Claim Review : live from Karachi - Claimed By : ZK Productions - Fact Check : Misleading Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software