About: http://data.cimple.eu/claim-review/9f0c1b322fe7cdb02ea041e78d63a2785c07bb6b8fcdf71ac696558b     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा कल्याण येथील व्हिडीओ. Fact व्हायरल व्हिडीओ ब्राझील येथील असून कल्याण येथील असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण या महत्वाच्या शहरात अलीकडे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. दरम्यान मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र आमच्या तपासात हा व्हिडीओ कल्याणचा नसून ब्राझीलचा असल्याची माहिती मिळाली. “कल्याणच्या अरिहंत सोसायटीमधील घटना, सोसायटीमधील लहान मुलांचे अक्षरशः लचके तोडले” असे सांगत संबंधित १ मिनिटांचा व्हिडीओ Facebook आणि X या समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. काही सोशल मीडिया युजर्सनी कल्याण येथे राहणाऱ्या परप्रांतीयांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे असे म्हणत हा व्हिडीओ शेयर केला असल्याचे दिसते. तर काहींनी भूतदया या नावाखाली कुत्री पाळणाऱ्यांनी इतरांच्या जीवावर बेतले हे ही पाहावे अशा कॅप्शनखाली हा व्हिडीओ शेयर केला आहे. न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. Fact Check/ Verification कल्याण येथे अलीकडेच मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान व्हायरल व्हिडीओ अशा घटनांशी संबंधित आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. मात्र कल्याण येथील कोणत्याही घटनेशी या व्हिडिओचा संबंध असल्याचे आम्हाला दिसून आले नाही. मागील एक महिन्यांपासून घडलेल्या कल्याण येथील घटनांच्या आम्हाला बातम्या मिळाल्या मात्र त्यासंबंधित फोटो आणि व्हिडिओचा व्हायरल व्हिडिओही संबंध जुळला नाही. अशा बातम्या येथे, येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येतील. कल्याण पूर्व येथील अथर्व श्रीवास नावाच्या ८ वर्षीय मुलावर मोकाट कुत्र्याचा हल्ला झाल्याची बातमी आम्हाला मिळाली. कुत्र्यांनी त्याच्या गुप्तांगाला चावा घेतल्याचे समजले मात्र या घटनेतील व्हिडीओ उपलब्ध झाला नाही. दरम्यान व्हायरल व्हिडिओचा शोध घेण्यासाठी आम्ही त्याच्या काही किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला @perrenguemt या X अकाउंटने व्हायरल व्हिडिओचा वेगळ्या अँगलने शूट केलेला भाग १४ नोव्हेंबर २०२४ रोजी अपलोड केला असल्याचे पाहावयास मिळाले. संबंधित पोस्टवर “Crianças ficam gravemente feridas após ataque de dois pitbulls.” अशी कॅप्शन आम्हाला दिसली. Google Translate वर संबंधित भाषा शोधली असता ती Portuguese (Brazil) असल्याचे कळले. यावरून आम्ही संबंधित कॅप्शनचे मराठीत भाषांतरण केले असता, “दोन पीटबुल्सच्या (कुत्र्यांच्या) हल्ल्यात मुले गंभीर जखमी” अशी माहिती मिळाली. यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित पोर्तुगीज कॅप्शन Google वर शोधली असता ब्राझील येथील माध्यम Jovem Pan News च्या युट्युब चॅनेलवर आम्हाला व्हायरल व्हिडिओतील भाग वापरून १४ नोव्हेंबर २०२४ रोजी अपलोड केलेली बातमी मिळाली. “साओ पाउलोच्या उत्तर विभागातील खेळाच्या मैदानात या मंगळवारी (१२) रोजी दोन पिटबुल्सच्या हल्ल्यात दोन मुले, एक १२ वर्षांची मुलगी आणि ११ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या अहवालानुसार, दोघांनाही “दुखित जखमा” झाल्या आणि त्यांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले.” असे डिस्क्रिप्शन आम्हाला या व्हिडिओच्या खाली वाचायला मिळाले. यानंतर आम्ही आणखी शोध घेतला असता ब्राझीलच्या साओ पाउलोच्या उत्तर विभागातील घडलेल्या या घटनेची माहिती देणारे पोर्तुगीज भाषेतील अनेक मीडिया रिपोर्ट मिळाले असून त्यामध्ये व्हायरल व्हिडिओतील किफ्रेम्स पाहता येतात. संबंधित बातम्या येथे, येथे आणि येथे पाहता येतील. यावरून संबंधित व्हायरल व्हिडीओ ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे घडलेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यातील कोणत्याही घटनेशी संबंधित नसल्याचे स्पष्ट होते. Conclusion अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात कल्याण येथील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडीओ म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडीओ ब्राझील येथील असल्याचे आणि खोटा दावा करून शेयर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. Result: False Our Sources Tweet made by perrenguematogrosso on November 14, 2024 Video published by Jovem Pan News on November 14, 2024 News published by Metro World News on November 14, 2024 News published by grandeponto on November 14, 2024 News published by telegraf on November 13, 2024 कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software