schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
सोशल मीडियात व्हायरल झालेला लहान मुलीचा जीव वाचवणाऱ्या जवानाच्या धाडसाचा व्हिडिओ Russia-Ukraine Conflict दरम्यानचा असल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आकाशात धूर दिसत आहे. गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. एक रणगाडाही उभा आहे, ज्याच्या मागे तीन सैनिक तैनात आहेत. व्हिडिओ सुरू झाल्यानंतर काही सेकंदांनंतर, दोन सैनिकांनी शत्रूवर गोळीबार सुरू केला, ज्यांचा आडोसा घेत तिसरा जवान दुसऱ्या बाजूला धावतो आणि एका लहान मुलीला सुरक्षितपणे टॅंकच्या मागील बाजूस आणतो.
Russia-Ukraine Conflict युद्धाचा आज सहावा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. मंगळवार, 1 मार्च रोजी, रशियाने राजधानी कीववर रॉकेट गोळीबार केला, ज्यात 70 हून अधिक युक्रेनियन सैनिक आणि डझनभर नागरिक ठार झाले.
लहान मुलीचा जीव वाचवणाऱ्या जवानाच्या धाडसाचा व्हिडिओ Russia-Ukraine Conflict दरम्यानचा आहे का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी प्रथम इन-व्हिड टूलच्या मदतीने व्हिडिओला काही कीफ्रेममध्ये रूपांतरित केले, नंतर रिव्हर्स इमेजच्या याच्या मदतीने शोध घेतला असता मिरर आणि एबीसी न्यूजच्या बातम्या मिळाल्या.
जून 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या मिररच्या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडिओच्या काही फ्रेम्स आहेत. बातमीनुसार, हा व्हिडिओ इराकच्या मोसुल शहरातील आहे, जिथे डेव्हिड यूबँक नावाच्या व्यक्तीने व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलीला इस्लामिक दहशतवाद्यांपासून वाचवले.
अहवालानुसार, डेव्हिड हा माजी अमेरिकन सैनिक आहे जो तणावग्रस्त भागात त्याच्या साथीदारांसह सामान्य लोकांना मदत करतो. या व्हिडीओच्या दिवशी इस्लामिक दहशतवाद्यांनी मोसुलमध्ये अनेकांची हत्या केली होती, असे या बातमीत म्हटले आहे. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या डेव्हिडने दहशतवादी हल्ल्यातू पाच वर्षांच्या मुलीला वाचवले होते.
डेव्हिडने साथीदारांची मदत घेत मुलीची सुटका करून तिला परत आणले. दाऊदच्या बेधडकपणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याचे खुप कौतुक झाले.
एबीसी न्यूजच्या अहवालात डेव्हिड आणि त्याच्या मानवतावादी मदत मोहिमेचा तपशील आहे. या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडिओ देखील पाहता येईल. डेव्हिड ‘फ्री बर्मा रेंजर्स’ या संस्थेचा संचालक आहे. त्यांनी म्यानमार (बर्मा) सह जगातील अनेक तणावग्रस्त भागात लोकांना मदत केली आहे. डेव्हिडची एक खास गोष्ट आहे, तो कुठेही गेला तरी त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत जाते आणि निराधारांना मदत करते.
अशा प्रकारे आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, लहान मुलीचा जीव वाचवणाऱ्या जवानाच्या धाडसाचा व्हिडिओ Russia-Ukraine Conflict दरम्यानचा नाही तर डेव्हिड यूबँक नावाच्या व्यक्तीने इराकमध्ये मुलीला इस्लामिक दहशतवाद्यांपासून वाचवले असून तो पाचवर्षांपुर्वीचा आहे.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Yash Kshirsagar
March 1, 2022
Yash Kshirsagar
March 4, 2022
Yash Kshirsagar
February 26, 2022
|