schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
चाहत्यांमध्ये ‘पॉली’ म्हणून ओळखला जाणारा आणि २०१० पासून मुंबई इंडियन्स च्या माध्यमातून आयपीएल गाजविणारा क्रिकेटर कायरन पोलार्ड याने आपली निवृत्ती जाहीर केली. या पोलार्ड चे नाव आता मुंबई येथील रस्त्याला देण्यात आले आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईसाठी खेळलेला क्रिकेटर म्हणून त्याला मुंबई महानगरपालिकेने अशा पद्धतीने ट्रिब्यूट दिला आहे, असाच या दाव्याचा अर्थ आहे.
सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एक फलक दाखविण्यात आला असून त्या फलकावर मराठीत ‘कायरन पोलार्ड मार्ग’ आणि इंग्रजीत ‘Pollard road’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
“आपल्या सन्माननीय सदस्याचे अर्थात पोलार्ड तात्यांचे नाव रस्त्याला देण्याची वेळ आली? काय सांगायचे…” असे पोस्ट करणाऱ्या Sports18 या ट्विटर वरील व्हेरीफाईड हॅन्डलने म्हटले आहे.
यामुळे पोलार्ड प्रेमी नक्कीच असे झाले असेल काय? या संभ्रमात पडू शकतात.
मुंबई इंडियन्स मधून अर्थात आयपीएल मधून खेळाडू म्हणून त्याने सेवा निवृत्ती घेतली असली तरी त्याची नियुक्ती प्रशिक्षक म्हणून करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहता कायरन पोलार्ड च्या एकंदर कामगिरीची दखल घेऊन त्याचे नाव एका मार्गाला दिले असावे असे संस्कृत दर्शनी वाटते. मात्र इतके महान खेळाडू घडविलेल्या मुंबईने असे नक्कीच केले असेल का हे पाहण्यासाठी आम्ही फॅक्ट चेक केले.
आम्हाला हा दावा सत्य वाटला नाही. यामुळे आम्ही या दाव्याचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वप्रथम “कायरन पोलार्ड चे नाव दिले मुंबईतील रस्त्याला” अश्या किवर्ड सर्च च्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई महानगरपालिकेत असा ठराव झाल्याचे, तसा प्रस्ताव कुणी ठेवल्याचे किंवा अशाप्रकारे कोणा क्रिकेट प्रेमी संस्थेने मागणी केल्याचेही आढळून आले नाही. यामुळे या फलकाच्या फोटो बद्दल संशय निर्माण झाला. आम्ही रिव्हर्स इमेज सर्च च्या माध्यमातून व्हायरल पोस्टमधील फोटो सर्च केला असता आम्हाला एक दुसराच फलक सापडला जो मुंबईच्या बांद्रा उपविभागातील असल्याचे दिसून आले.
हा फलक व्हायरल फोटोप्रमाणेच दिसतो. त्यावर मराठी ‘सेंट पॉल मार्ग’ आणि इंग्रजीत ‘St. Paul Road’ असा उल्लेख आढळून आला. दोन्ही फोटोत रस्त्याची नावे वगळता बरेच साम्य आहे. बृ.मु.म.प. असा उल्लेख, मनपाचे बोधचिन्ह आणि इतर अनेक गोष्टी समान आहेत. वांद्रे (प.) आणि Bandra (W.) हा उल्लेख काढून टाकून त्याठिकाणी केवळ इंग्रजी आणि मराठीत मुंबई असे लिहिण्यात आले असून रस्त्याची नावे तितकीच बदलण्यात आली आहेत. यामुळे एडिटिंग तंत्राचा वापर करून हा घोळ करण्यात आल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
याचबरोबरीने आम्ही थेट मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधला. मुंबई महानगरपालिकेच्या पश्चिम विभागाचे ज्युनियर इंजिनियर मुकेश गिरी यांना आम्ही या संदर्भात माहिती विचारली. त्यांनी ” असा कोणताही प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेकडे आलेला नाही. तशी मागणीही झालेली नाही, किंवा मुंबई महानगरपालिकेने असे कोणत्याही रस्त्याचे नाव कधीच बदललेले नाही,” अशी माहिती दिली. नुकताच मुंबई इंडियन्स मधून निवृत्ती पत्करलेला क्रिकेटर कायरन पोलार्ड याचे नाव एकाद्या रस्त्याला देण्यात आले आहे का? असे आम्ही त्यांना विचारले असता, ” तसे काहीही झालेले नाही.” असे उत्तर त्यांनी दिले.
एकंदर तपासाअंती आम्हाला हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा वाटलं. मुंबई महानगरपालिकेने न केलेले काम एडिटिंग च्या माध्यमातून खरे भासविण्याचा प्रकार पाहावयास मिळाला आहे. दिशाभूल करणारा दावा करून क्रिकेट प्रेमींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाल्याचे आम्हाला पाहावयास मिळाले आहे.
Our Sources
Information received on streetsigns.co.il
Telephonic talk with concern officer of Mumbai City Corporation
Official Website of Mumbai Indians
News Published by The Economic Times
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in
Prasad Prabhu
January 31, 2025
Yash Kshirsagar
December 23, 2021
Yash Kshirsagar
January 31, 2022
|