About: http://data.cimple.eu/claim-review/e0f8fad238b9997a79a73442f0d67ecded89bc4fbd1966b8b2d1e0d0     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: ओडिशा चा जुना व्हिडिओ आता कलकत्त्याच्या सांगून भ्रम फैलावला जात आहे विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा ठरला. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कलकत्त्याच्या नाही ओडिशा, भद्रक जिल्ह्याचा आहे. - By: Pallavi Mishra - Published: May 6, 2021 at 03:34 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात लोकांची गर्दी पोलिसांच्या गाडी वर हल्ला करताना दिसत आहे. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ कलकत्त्याच्या आहे. हा हाल निवडणुकांचा निकाल आल्यानंतर चा आहे. विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा ठरला. तपासात कळले कि हा व्हिडिओ ओडिशा चा आहे. व्हिडिओ भद्रक जिल्ह्याच्या तिहड़ी ब्लॉक चा आहे जिथे एका व्यक्तीच्या मृत्यू नंतर स्थानीय लोकांनी पोलिसांच्या जीप वर हल्ला केला. हि गोष्ट खरी आहे कि २ मे नंतर विधानसभा निवडणुकांनंतर निकाल आल्यावर पश्चिम बंगाल मध्ये हिंसा भडकली होती, ज्यात लोकांचा बराच नुकसान झाला आणि त्याच्या बातम्या देखील आल्या. काय होत आहे व्हायरल? व्हायरल व्हिडिओ मध्ये एका पोलिसांच्या गादीवर हल्ला करताना लोकांना बघितले जाऊ शकते. पोस्ट मध्ये दावा करण्यात येत आहे कि, “BengalViolence #PresidentRuleInBengal Policeman came to control the situation & then TMC goons attacks on Police.#tmcgoons #BengalViolence #नींदसेजागोअमितशाह_जी” या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: तपासाची सुरुवात आम्ही हा व्हिडिओ InVID टूल मध्ये टाकून केला. त्यात आम्हाला किफ्रेम्स मिळाले, या किफ्रेम्स ला आम्ही गूगल रिव्हर्स इमेज सर्च मध्ये टाकून शोधले. आम्हाला ओडिया टीव्ही चॅनेल कलिंगा टीव्ही च्या युट्युब चॅनेल वर एक बातमी मध्ये हे क्लिप्स मिळाले. १३ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या बातमी प्रमाणे, “पोलिसांद्वारे पिटाई केल्यानंतर एका युवक ची मृत्यू झाली त्यानंतर भद्रक च्या स्थानीय लोकांनी पोलीस वैन वर लोकांनी हल्ला केला.” आम्हाला या क्लिप कनक न्यूज़ च्या युट्युब चॅनेल वर अपलोड केलेल्या एका व्हिडिओ मध्ये देखील मिळाला. १३ जानेवारी २०२१ रोजी अपलोड केलेल्या एका बातमी प्रमाणे हि घटना भद्रक ची आहे. odishatv.in च्या बातमी प्रमाणे, “युवकाच्या कथिक आत्महत्येने नाराज, भद्रक जिल्ह्याच्या एका गावातील निवासीयांनी बुधवारी एका पोलीस वॅन ला आग लावून दिली. तिहाड़ी पुलिस च्या अंतर्गत हटुरी गाँव च्या बापी महलिकनाम नावाच्या युवकास असंतोष पसरला. त्यांचा शव एका तलावात सापडला.” या विषयाच्या पुष्टीसाठी आम्ही दैनिक जागरण चे कलकत्याचे ब्यूरो चीफ जे के वाजपेयी यांना संपर्क केला. त्यांनी म्हंटले, “हा व्हिडिओ बंगाल चा नाही, ओडिशा चा आहे, पण बंगाल मध्ये देखील अश्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत.” आम्ही तपासाच्या पुढच्या टप्प्यात, एका टीव्ही चॅनेल कनक टीवी चे वेब डिवीज़न चे डिप्टी एडिटर प्रदीप कुमार रथ यांना देखील संपर्क केला. आमच्या सोबत फोन वर बोलताना त्यांनी सांगितले, “हा व्हिडिओ ओडिशातील भद्रक चा आहे. एका व्यक्तीच्या मृत्यू नंतर पोलिसांच्या जीप वर लोकांनी हल्ला केला आणि त्यात आग लावून दिली.” इंग्लिश जागरण मध्ये ४ मे रोजी प्रकाशित बातमी प्रमाणे, “पश्चिम बंगाल मध्ये नुकतेच विधानसभा निवडणुकांनंतर तृणमूल काँग्रेस जिंकल्यानंतर बऱ्याच राज्यात हिंसा झाली, ज्यात ११ लोकं दगावले, आणि बरेच जखमी झाले.” अधिक माहिती साठी हि बातमी वाचा. आता आम्ही पोस्ट शेअर करणाऱ्या ट्विटर यूजर ANIL PATIDAR @anilhindu116 यांच्या प्रोफाइल चा तपास केला. त्यांचा प्रोफाइल स्कॅन केल्यानंतर आम्हाला कळले कि यूजर राजस्थान चा रहिवासी आहे. निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल दावा खोटा ठरला. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कलकत्त्याच्या नाही ओडिशा, भद्रक जिल्ह्याचा आहे. - Claim Review : बंगाल मधील हिंसेचा व्हिडिओ - Claimed By : ANIL PATIDAR @anilhindu116 - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software