schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Coronavirus
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गंगा नदीत 150 प्रेते वाहून आल्याच्या दाव्याने काही फोटो सोशल मीडियात शेअर होत आहेत. यात प्रेते पाण्यावर तरंगताना दिसत आहेत तर कावळे आणि कुत्रे त्यांचे लचके तोडताना दिसत आहेत. दुस-या एका फोटोत ही प्रेत ओढण्यासाठी जेसीबी मशीन लावण्यात आल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील गंगा नदीत कोरोनाने मृत पावलेल्याची प्रेते फेकून दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याच दरम्यान हे फोटो व्हायरल झाले आहेत
काय म्हटले आहे व्हायरल पोस्टमध्ये?
बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गंगा नदीत 150 प्रेत तरंगताना दिसून आली आहेत. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या लोकांना जाळायला लाकडे मिळत नसल्याने अनेक नातेवाईकांनी हे मृतदेह गंगा नदीत सोडून दिले आहेत. मात्र गाव आणि स्थानिक लोक म्हणत आहेत की, हे मृतदेह बिहारमधील नसून उत्तरप्रदेशमधून वाहत बिहारमध्ये आले आहेत.
फेसबुकवर याच दाव्याने हे फोटो व्हायरल होत आहेत. यात अनेक पोस्टकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हटले आहेल की, विचार करा हे जरा महाराष्ट्रात झाल असत तर फडणीस भक्त , अंधभक्त आणि इतर महाराष्ट्र द्रोही किती नंगा नाच केला असता देशात बदनाम केला असता.
crowdtangle वर या पोस्ट संदर्भात 5,270 इंट्रेक्शन्स आढळून आले आहेत तर Vivek Nakade यांच्या पोस्टला सर्वात जास्त 450 लाईक्स मिळाल्या आहेत.
व्हायरल होत असलेले फोटो हे बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील गंगा नदीत वाहून आलेल्या कोरोना ने मृत पावलेल्यांच्या प्रेतांचे आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. याच शोधा दरम्यान महाराष्ट्र टाईम्स ची 10 मे रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आम्हाला आढळून आली. या बातमी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना संसर्ग होत आहे. अशात स्थितीत आता प्रशासनासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी हमीरपूर जिल्ह्यात यमुना नदीत मोठ्या प्रमाणावर मृतदेह आढळून आले होते. आता बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीवरील एका घाटावर मृतदेहांचा खच दिसून आला आहे.
या बातमीत मात्र कुठेही आम्हाला व्हायरल फोटो दिसून आले नाहीत. त्यामुळे व्हायरल फोटो नेमके कुठले आहेत याचा शोध पुढे सुरु ठेवला. याच दरम्यान आम्ही व्हायरल फोटो गूगल इमेजच्या माध्यमातून शोधले असता आम्हाला scoopwhoop.com वर 28 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत हे फोटो आढळून आले. यात म्हटले आहे की,2008 मध्ये एका पर्यटकाने भारतातील काही फोटो आपल्या कॅमे-यात कैद केले. ही फोटोआपल्या संस्कृतीच्या आड आपण दुर्लक्ष करीत असलेल्या भारताची प्रतिमा दर्शवित होते. गंगा आणि आसपास परिसरातील जवळपास 50 फोटो चिनी माध्यमांमध्ये खूप व्हायरल होत आहेत.
या फोटोत भारतातील सर्वात पवित्र नदी गंगेत किती प्रकारची घाण मिसळली आहे याची दृश्ये कैद केली आहेत. सांडपाणी घाण, तरंगणारे मृतदेह, फॅक्टरी केमिकल, मानवी मेला, शेण, जनावरांची हाडे या सर्व गोष्टी त्यात दिसतात. 2008 नंतर ही या गोष्टी बदलल्या नाहीत. जानेवारी 2015 मध्ये गंगेच्या उपनदीत 100 हून अधिक मृतदेह सापडले होते.प्राणी हे मृतदेह फाडून टाकत होते, पक्षी त्यांना खाऊन टाकत होते. त्याशिवाय उत्तर प्रदेशमधील परियार गावाजवळ नदीत सुमारे 102 मृतदेह तरंगताना आढळले. सरकार कदाचित या तरंगत्या मृतदेहांकडे पहात नाही, म्हणून ते दाखविणे महत्वाचे आहे.
यात gettyimages चा उल्लखे असल्याने आम्ही त्या वेबसाईटवर या फोटो बाबत शोध घेतला असता आम्हाला दोन्ही फोटो तेथे आढळून आले.
पहिल्या फोटोच्या कॅप्शन मध्ये म्हटले आहे की, भारताच्या उन्नाव येथे 14 जानेवारी 2014 रोजी परियारजवळ गंगा नदीत तरंगत असलेले मृतदेह काढत असताना सरकारी कर्मचारी. मागील दोन दिवसांत उत्तर प्रदेशच्या या भागात गंगा नदीतून 100 हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. केंद्राने त्यामागील कारण शोधण्यासाठी अधिका-यांना घटनास्थळी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. काल सुमारे 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले, आज आणखी 70 मृतदेह बाहेर काढण्यात आले.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, सोशल मीडियात व्हायरल होत असलेले प्रेतांचे फोटो बक्सर जिल्ह्यात गंगा नदीत फेकलेल्या कोरोना मृतांचे नाहीत तर सहा वर्षापुर्वी उत्तरप्रदेशातील परियार येथे गंगा नदीत आढळलेले 100 मृतदेहांचे आहेत. तेच फोटो आता कोरोनाग्रस्तांच्या नावाने व्हायरल झाले आहेत.
Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?
|Claim Review: बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील प्रेतांचे व्हायरल फोटो
Claimed By: Social Media post
Fact Check: Misplaced context
scoopwhoop- https://hindi.scoopwhoop.com/these-60-scary-and-filthy-photos-of-India-is-going-viral-in-china/
Gettyimages- https://www.gettyimages.in/detail/news-photo/scavenger-dogs-and-crow-gather-around-dead-human-bodies-news-photo/461525246
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Yash Kshirsagar
May 4, 2021
Yash Kshirsagar
May 5, 2021
Yash Kshirsagar
May 17, 2021
|