About: http://data.cimple.eu/claim-review/ed4ad4149cc22bc5fb40fc46ca407e03e42730edd07058142cf10938     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: इजिप्शियन स्पोर्ट्स क्लबच्या व्हिडिओला, पॅराग्लायडरवर स्वार हमासचे दहशतवादी म्हणून FAKE दाव्यासह केले जात आहे शेअर - By: Umam Noor - Published: Oct 31, 2023 at 05:53 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज). सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनेक लोक पॅराग्लायडिंग करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत वापरकर्ते दावा करत आहेत की, इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. विश्वास न्यूजला आपल्या तपासात आढळले की, व्हायरल केला जात असलेला व्हिडिओ इजिप्तमधील एका स्पोर्ट्स क्लबचा असून त्याचा हमास – इस्रायल युद्धाशी काहीही संबंध नाही. या व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. काय आहे व्हायरल पोस्टमध्ये? फेसबुक वापरकर्त्याने व्हायरल व्हिडिओला शेअर करताना लिहिले की, “धोका डोक्यावर घिरट्या घालत होता, बंदुकधारी दहशतवादी मोटर फिट ग्लायडर्सवरून खाली उतरत होते परंतु उद्यानांमध्ये उत्सव साजरा करणाऱ्या इस्रायली नागरिकांना असे वाटले की, हा एक प्रकारचा खेळ सुरू आहे. ते शिट्ट्या मारत होते, व्हिडिओ बनवत होते, आणि अचानक AK47 ची ताडताड सुरू झाली तेव्हा त्यांना एका मिनिट काहीहीच समजले नाही. आज तुमचा शत्रू तुम्हाला दिसत नाही, पण तो तुमच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे. आता तुम्हीसुद्धा उत्सव साजरा करा.” पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पहा. तपास आमचा तपास सुरु करताना, आम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला. व्हिडिओमध्ये आम्हाला टिकटॉक आईडी @ eslamre1 लिहिलेले दिसत आहे. आम्ही हा व्हिडिओ टिकटॉकवर पाहण्यासाठी व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर केला, कारण भारत सरकारने 2020 मध्ये टिकटॉकवर बंदी घातली होती. जेव्हा टिकटॉक आईडी eslamre1 वर व्हायरल व्हिडिओ शोधला गेला, तेव्हा आम्हाला हा व्हिडिओ याच वापरकर्त्याने अपलोड केलेला आढळला. हा व्हिडिओ खोट्या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, या वापरकर्त्याने त्याच्या आयडीवरून स्पष्टीकरण दिले आणि व्हिडिओवरून पुष्टी केली की, “हा व्हिडिओ पॅलेस्टाईन किंवा हमासचा नाही तर इजिप्शियन आणि इजिप्शियन सशस्त्र सैन्याचा आहे.” त्याच वापरकर्त्याने त्याच प्रसंगाचा दुसरा व्हिडिओ 28 ते 30 सप्टेंबर दरम्यानच्या व्हायरल व्हिडिओचा भाग 2,3,4 म्हणून शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ अल-नस्र क्लबचा आहे. या आधारावर आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि गुगलवर अल-नस्र क्लबचा शोध घेतला. गुगल मॅप्सच्या माध्यमातून आम्ही वायरल व्हिडिओ जिथला होता नेमक्या त्याच ठिकाणी पोहोचलो. हा व्हायरल व्हिडीओ इस्रायलचा असल्याचे शेअर केले जात आहे, त्यामुळे याची खात्री करण्यासाठी आम्ही इस्रायलच्या दा व्हिसलचे फॅक्ट चेकर उरिया बार मेर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आम्हाला सांगितले की, हा व्हिडीओ इस्रायलवरील हमासच्या हल्ल्याचा नाही. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिले. या संघर्षात आतापर्यंत 1,300 इस्त्रायली आणि 1,900 पॅलेस्टिनींसह एकूण 3,200 लोकांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, गाझामध्ये हमासने 120 हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवले आहे. दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक पेजच्या सोशल स्कॅनिंगमध्ये आम्हाला आढळले की, ‘राष्ट्रवादी‘ नावाच्या या पेजचे नऊ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पॅलेस्टाईन आणि इस्रायलशी संबंधित अनेक दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा तपास विश्वास न्यूजने केला आहे, आमचे सर्व फॅक्ट चेक येथे वाचल्या जाऊ शकतात. निष्कर्ष: विश्वास न्यूजला आपल्या तपासात असे आढळले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ इजिप्शियन स्पोर्ट्स क्लबचा आहे, ज्याचा हमास-इस्रायल युद्धाशी काहीही संबंध नाही. व्हायरल व्हिडीओबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा आहे. - Claim Review : हा व्हिडिओ, इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळचा आहे. - Claimed By : FB पेज: राष्ट्रवादी - Fact Check : Misleading Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software