About: http://data.cimple.eu/claim-review/f08d2775bcec9bd223e06d71b177ea85b908af400acb0c982cf30641     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check: अक्षय कुमार च्या हातात दिसत असलेला प्लकार्ड एडिटेड आहे, २०२० चे छायाचित्र खोट्या दाव्यासह होत आहे व्हायरल विश्वास न्यूज च्या तपासात, अक्षय कुमार च्या नावावर व्हायरल होत असलेला फोटो खोटा असल्याचे कळले. अक्षय कुमार यांनी हातात पकडलेले प्लकार्ड एडिट केलेले आहे. एप्रिल २०२० मध्ये खरे छायाचित्र त्यांनी कोरोना वॉरियर्स यांचे आभार मानण्यास शेअर केले गेले होते, ज्यावर लिहले होते, ‘दिल से थैंक यू’. - By: Umam Noor - Published: Mar 1, 2021 at 09:27 PM नवी दिल्ली (विश्वास न्यूज): काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ‘मोदी रोजगार दो’ ट्रेंड करत आहे. याच संदर्भात बॉलीवूड ऍक्टर अक्षय कुमार चे एक छायाचित्र शेअर केले जात आहे ज्यात त्यांच्या हातात एक प्लकार्ड दिसत आहे, ज्यावर लिहले आहे ‘मोदी जी रोज़गार दो।’ आणि ट्विटर वर शेअर होत असलेल्या या छायाचित्रावर लिहले होते, ‘योगी जी रोजगार दो’ या फोटो ला खरे मानून बरेच लोकं शेअर करत आहेत. विश्वास न्यूज च्या तपासात व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी असल्याचे समजले. अक्षय कुमार च्या हातात दिसत असलेला प्लकार्ड एडिट केलेला आहे. हे छायाचित्र एप्रिल २०२० चे आहे, या प्लकार्ड वर ‘दिल से थैंक यू’ लिहलेले आहे. काय होत आहे व्हायरल? ट्विटर यूजर ‘amor mathmatics’ ने ऍक्टर अक्षय कुमार चे एक छायाचित्र शेअर केले, ज्यात त्यांच्या हातात एक प्लकार्ड दिसतो, ज्यावर लिहले आहे, ‘योगी जी रोज़गार दो’। अक्षय कुमार चे हेच छायाचित्र ‘मोदी जी रोज़गार दो’ या नावावर देखील व्हायरल होत आहे. या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा. तपास: आम्ही तपासाची सुरुवात गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या माध्यमातून केली, व्हायरल छायाचित्राला आम्ही इंटरनेट वर शोधले. सर्च मध्ये आम्हाला ९ एप्रिल २०२० रोजी अक्षय कुमार च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर हे छायाचित्र सापडले. प्लकार्ड वर लिहले होते, ‘‘#Dil se Thank You’. छायाचित्र शेअर करून त्यांनी कोरोना वॉरियर्स ला धन्यवाद दिले आणि आपले फोटो शेअर केले. अक्षय कुमार चे हेच छायाचित्र आम्हाला त्यांच्या इंस्टाग्राम हॅन्डल वर देखील मिळाले. खऱ्या आणि खोट्या छायाचित्रामधले फरक तुम्ही स्पष्ट बघू शकता. आता हे स्पष्ट आहे कि अक्षय कुमार चे हे व्हायरल होत असलेले छायाचित्र एडिटेड आहे. आता आम्ही हे जाणून घयायचा प्रयत्न केला कि ट्विटर वर ट्रेंड होत असलेल्या ‘मोदी रोज़गार दो’ यावर अक्षय कुमार यांनी काही ट्विट केले का. सर्च मध्ये आम्ही त्यांचे ट्विटर प्रोफाइल स्कॅन केले आणि न्यूज सर्च देखील केले, पण आम्हाला असे कुठलेच रिपोर्ट सापडले नाही जे व्हायरल होत असलेल्या पोस्ट ची पुष्टी करतील. तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही दैनिक जागरण चे बॉलीवूड बीट सांभाळणारे आमच्या कॉरेस्पॉन्डेंट स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला आणि त्यांच्या सोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र एडिटेड आहे. अक्षय कुमार यांनी ‘मोदी जी रोज़गार दो’ या ट्विटर ट्रेंड च्या समर्थानात कुठलेच ट्विट केले नाही. खोटा दावा शेअर करणाऱ्या ट्विटर यूजर amor mathmatics यांचे सोशल प्रोफाइल आम्ही स्कॅन केले त्यात आम्हाला कळले कि त्यांना, १८३ लोकं फोल्लो करतात, हा अकाउंट एप्रिल २०१८ मध्ये बनवला गेला. निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात, अक्षय कुमार च्या नावावर व्हायरल होत असलेला फोटो खोटा असल्याचे कळले. अक्षय कुमार यांनी हातात पकडलेले प्लकार्ड एडिट केलेले आहे. एप्रिल २०२० मध्ये खरे छायाचित्र त्यांनी कोरोना वॉरियर्स यांचे आभार मानण्यास शेअर केले गेले होते, ज्यावर लिहले होते, ‘दिल से थैंक यू’. - Claim Review : अक्षय कुमार यांनी रोजगार देण्यास ट्विट केले - Claimed By : amor mathmatics - Fact Check : False Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know! Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • English
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.123 as of May 22 2025


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data]
OpenLink Virtuoso version 07.20.3241 as of May 22 2025, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 8 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2026 OpenLink Software