संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हटले नाही; बनावट ग्राफिक व्हायरल
आपल्या रोखठोक वक्यव्याने नेहमी चर्चेत राहणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हटले, या दाव्यासह लोकमतचे लोगो असलेले ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले ग्राफिक कार्ड बानावट आहे.
काय आहे दावा ?
संजय राऊत यांचा फोटो आणि लोकमतचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, "लोकं उद्धव ठाकरेंना मुस्लिम ह्रद्यसम्राट म्हणत असतील तर त्यात वावगं काय ? हिंदू ह्रद्यसम्राटचा मुलगा पण एका दुसऱ्या धर्माचा ह्रद्यसम्राट असू शकतो. – संजय राऊत."
मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुस्लिम ह्रद्यसम्राट म्हटल्याचे कोणत्याही अधिकृत माध्यमांवर आढळत नाही.
तसेच लोकमतच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरदेखील हे ग्राफिक आढळले नाही.
याउलट लोकमतच्या वेबसाईटवर असणारे ग्राफिक कार्ड आणि व्हायरल ग्राफिक कार्डमध्ये फरक आढळला.
लोकमतचे खंडण
लोकमतने 19 ऑक्टोबर रोजी फोसबुक व ट्विटर पेजवर हे ग्राफिक फेक असून त्यांच्याकडून जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.
पोस्टमध्ये लिहिले होते की, "सदर क्रिएटिव्ह (ग्राफिक कार्ड) लोकमतने तयार केलेलं नाही. 'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरुन दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. या खोडसाळपणाची तक्रार आम्ही 'सायबर क्राइम'कडे करत आहोत."
चंद्रशेखर बावनकुळे
भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबतचे एक दिशाभूल करणारे ग्राफिक कार्ड ‘लोकमत’च्या नावाने व्हायरल झाले होते.
लोकमतने 22 ऑक्टोबर रोजी ट्विटर पेजवर हे ग्राफिक फेक असल्याचे स्पष्ट केले.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक बनावट असून लोकमतने जारी केले नाही. तसेच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हटल्याचा कोणताही पुरावा नाही. खोट्या दाव्यासह हे ग्राफिक व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)