schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
राष्ट्रपती मुर्मू या उमेदवारी दाखल करण्यासाठी पंतप्रधान मोदींसोबत आल्या होत्या.
Fact
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मूच्या नामांकनावेळचा २०२२ चा फोटो दिशाभूल करीत व्हायरल केला जात आहे.
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे छायाचित्र समोर आले आहे. चित्रात, पंतप्रधान मोदी टेबलावर बसलेल्या व्यक्तीला कागदपत्रांचे बंडल देताना दिसत आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सनी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदींसोबत गेल्या होत्या असा दावा करीत हा फोटो शेयर केला आहे. न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले.
अनेक फेसबुक युजर्सनी कॅप्शनसह प्रतिमा शेअर केली, “श्री नरेंद्र मोदी, भारताचे राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती हे निवडणूक आचारसंहितेचे घोर उल्लंघन आहे. त्यांनीही आपल्या पदाची बदनामी केली आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली पाहिजे.” इतरांनी असाच दावा करणाऱ्या X पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला.
अशा पोस्ट येथे, येथे आणि येथे पाहता येतील.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
“नरेंद्र मोदी,” “नामांकन” आणि “लोकसभा निवडणुका” या कीवर्डच्या शोधामुळे पंतप्रधानांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत उमेदवारी दाखल केली आहे असे सूचित करणारे कोणतेही विश्वसनीय रिपोर्ट मिळाले नाहीत.
तथापि, अनेक रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ मे रोजी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
यानंतर, आम्ही गुगल लेन्सवर व्हायरल प्रतिमा शोधली, ज्यामुळे आम्हाला २५ जून २०२४ रोजीच्या नवभारत टाइम्सने दिलेल्या रिपोर्टकडे नेले. व्हायरल प्रतिमा जोडलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज भरताना जेडीयूच्या लालन सिंह यांना फोन केला.
नरेंद्र मोदींच्या २४ जून २०२२ रोजीच्या एका X पोस्टमध्ये कॅप्शनसह छायाचित्र देखील होते, “आज सुरुवातीला, श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांसोबत गेलो होतो.”
ANI ने २४ जून २०२२ रोजी दिलेल्या रिपोर्टमध्ये मुर्मू यांनी NDA च्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरतानाचा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. सुमारे १:५७ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, व्हायरल व्हिज्युअल वेगळ्या कोनातून पाहिले जाऊ शकते.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी २४ जून रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकनावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) इतर ज्येष्ठ सदस्यही उपस्थित होते.”
अशाप्रकारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना काढलेली जुनी प्रतिमा भारताच्या राष्ट्रपती पंतप्रधान मोदींसोबत त्यांच्या निवडणुकीच्या नामांकनाच्या वेळी आल्या हे दिशाभूल करीत दर्शविण्यासाठी वापरण्यात आली आहे.
Sources
Report By Navbharat Times, Dated June 25, 2024
X Post By Narendra Modi, Dated June 24, 2022
YouTube Video By ANI, Dated June 24, 2022
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|