schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
फोटोत अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोससोबत असलेली महिला मनमोहन सिंग यांची मुलगी आहे.
Fact
फोटोतील महिला सोरोसची पत्नी तामिको बोल्टन आहे आणि मनमोहन सिंग यांच्या तीन मुलींपैकी कोणतीही एक नाही. हा दावा खोटा आहे.
फोटोत अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोससोबत असलेली महिला मनमोहन सिंग यांची मुलगी आहे, असे सांगत एक फोटो व्हायरल करण्यात आला आहे.
आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मिळाला.
“काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मुलगी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काम करणाऱ्या जॉर्ज सोरोस यांच्यासोबत आपत्तीजनक स्थितीत, देशाविरोधात मनमोहन सिंग यांची मुलगी इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे का?” अशा कॅप्शनखाली हा दावा व्हायरल केला जात आहे.
आम्ही सर्वप्रथम व्हायरल पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोवर गुगल रिव्हर्स इमेज सर्चसह तपास सुरू केला. आम्हाला 13 ऑगस्ट 2012 रोजी द गार्डियनने प्रकाशित केलेला एक लेख सापडला, ज्यामध्ये “Billionaire investor George Soros with his fiancée Tamiko Bolton” अर्थात “अब्जपती गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस आणि त्याची भावी वधू तामिको बोल्टन” या मथळ्यासह तोच फोटो सापडला.
लेखात असे लिहिले आहे की, “जॉर्ज सोरोस यांनी 42 वर्षांनी लहान असलेल्या तामिको बोल्टनशी वैवाहिक भागीदारीची घोषणा करून आपला 82 वा वाढदिवस साजरा केला.”
यातून एक संकेत घेऊन, आम्ही संबंधित कीवर्डसह Google शोध घेतला. आम्हाला चायना डेलीने 12 ऑगस्ट 2012 रोजी प्रकाशित केलेला एक लेख सापडला, ज्यामध्ये आम्हाला आणखी एक फोटोसह समान फोटो आढळला. लेखाच्या मथळ्यात असे लिहिले आहे: “Billionaire George Soros getting married for the third time” अर्थात “अब्जाधीश जॉर्ज सोरोस तिसऱ्यांदा लग्न करत आहेत”.
गुगलवर आणखी शोध घेतल्याने असे दिसून आले की या जोडप्याने 21 सप्टेंबर 2013 रोजी बेडफोर्ड, न्यूयॉर्क येथे लग्न केले.
दरम्यान आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, व्हायरल छायाचित्रात अमेरिकन उद्योगपती सोबत मनमोहन सिंग यांची कन्या नसून त्याची पत्नी तामिको बोल्टन आहे.
तपासाच्या पुढील भागात, आम्ही “मनमोहन सिंग कन्या” वर गुगल सर्च केले आणि माजी पंतप्रधानांना उपिंदर सिंग, दमन सिंग आणि अमृत सिंग या तीन मुली आहेत. उपिंदर या दिल्ली विद्यापीठात इतिहासाच्या प्राध्यापक आहेत, दमन या लेखिका आणि कादंबरीकार आहेत तर अमृत या भारतीय वंशाच्या अमेरिकन मानवाधिकार वकील आहेत. अशी माहिती आम्हाला मिळाली.
आणखी तपासात आम्हाला इंडियन एक्स्प्रेसने 15 सप्टेंबर 2014 च्या रिपोर्टमध्ये छापलेला सिंह यांच्या तीन मुलींचा एकत्रित फोटो सापडला, ज्याचे शीर्षक आहे: “Former PM Manmohan Singh releases ‘Strictly Personal’ book by daughter” अर्थात “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘स्ट्रिक्टली पर्सनल’ हे त्यांच्या मुलीने लिहिलेले पुस्तक प्रकाशित केले”.
फोटो कॅप्शनमध्ये: “(डावीकडून उजवीकडे ) अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मुली”. असे लिहिले आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर व्हायरल फोटोत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तीनपैकी एकही कन्या नसल्याचे स्पष्ट होते.
अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल फोटोत अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोससोबत असलेली महिला मनमोहन सिंग यांची मुलगी आहे, हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. फोटोतील महिला सोरोसची पत्नी तामिको बोल्टन आहे आणि मनमोहन सिंग यांच्या तीन मुलींपैकी कोणतीही एक नाही.
Our Sources
Article published by The Guardian on August 13, 2012
Article published by China Daily on August 12, 2012
Article published by Indian Express on Suptember 15, 2014
Google Search results
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|